Views


*मोटार वाहन महसूलीच्या थकबाकी वसुलीसाठी वाहनांचा लिलाव*

    उस्मानाबाद/प्रतिनिधी


अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषण करून आणि लेखी नोटीस देऊनही मोटार वाहन कर जमीन महसूलाची थकबाकी शासन जमा करण्यात आली नाही. म्हणून वसूली योग्य असलेल्या रक्कमेच्या मागणी प्रिथ्यर्थ येणे असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी पुढील निर्दीष्ट केलेली जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत.त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
संबंधित कराची थकबाकी दि. 22 फेब्रुवारी 2022 पूर्वी येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे देण्यात आली नाही तर ही वाहने ई-लिलाव पध्दतीने विकण्यात येतील.लिलावाच्या दिनांकानंतर थकबाकीदारास वाहनांचा कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकार राहणार नाही.अशा तऱ्हेने केलेली विक्री कायम होण्यास अधिन राहील.
येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकावून असलेल्या आणि वाहन धारकामार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनाची लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने https//www.eauction.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येईल.लिलावाबाबत अटी आणि शर्ती तसेच वाहनांची यादी या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. लिलावाची तारीख 24 फेब्रुवारी 2022 (सकाळी 11 ते दुपारी 4) असेल.
                                                        
 
Top