Views




*कुष्ठरोग निर्मुलन जनजागृती कार्यक्रमांतर्गत नवीन रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करावेत- डॉ.डी.के. पाटील*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती कार्यक्रमातर्गत नवीन रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करावेत ,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ डी के पाटील यांनी केले आहे . जिल्हाधिकारी कौस्थुभ दिवेगावकर आणि जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमामध्ये 2021-22 या वर्षामध्ये आरोग्य शिक्षण अंतर्गत “RUN FOR LEPROSY” हा कार्यक्रम नुकताच जिल्हा रुग्णालयात घेण्यात आला . या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील बोलत होते . यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.के. मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
 या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र डॉ.व्ही.ए.होळे, वैद्यकीय अधिकारी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.अतुल घोगरे, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मलुन कार्यक्रमाचे सर्व अवैद्यकीय पर्यवेक्षक,कुष्ठरोग तंत्रज्ञ,अवैद्यकिय सहाय्यक,पॅरामेडीकल वर्कर तसेच परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या अधिसेवीका आणि प्रशिक्षण केंद्राच्या सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
 प्रतिमेचे पुजन आणि दीप प्रज्ज्वलन झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपस्थितांना कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून “RUN FOR LEPROSY” या कार्यक्रमास सुरूवात झाली.यात सर्व कुष्ठरोग कर्मचारी आणि परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला. ही धाव जिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी चौक, ताजमहल टॉकीज, काळामारूती चौक, जिल्हा रुग्णालय अशी करून जिल्हा रुग्णालय येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
              सर्व उपस्थितांना कुष्ठरोग जनजागृती तयार केलेले टी-शर्ट आणि कॅप वाटप करण्यात आले. हा जनजागृती कार्यक्रम संपूर्ण जिल्हयात राबवून समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृती करावी आणि समाजामध्ये दडून राहीलेले नवीन कुष्ठरुग्ण शोधून उपचाराखाली आणावेत आणि त्यांना बहुविध औषधोपचार सुरू करावा आणि रोगप्रसाराची साखळी खंडीत करावी, असे अवाहन डॉ. पाटील आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी केले.

 
Top