Views*शिवजयंती व ऊर्स शांतेत साजरा करण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन*

       

उस्मानाबाद/प्रतिनिधी


शिवजयंती आणि दर्गा हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांचा ऊर्स शांतेत आणि धार्मिक एकोप्याचा संदेश देत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.
 शिवजयंती आणि उर्सच्या समिती सदस्यांनी आज जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली असता,श्री.दिवेगावकर यांनी हे आवाहन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन राजकुमार माने,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश कोरडे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे,तहसीलदार (उस्मानाबाद) गणेश माळी, पोलीस अधिकारी पी.आय.शहर पोलीस स्टेशन व्हि.एस.जैस्वाल, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे,संस्थापक अध्यक्ष सोहळा समिती शिवराज्य भिषेक विष्णू नरेंद्र इंगळे आणि शिवजयंती आणि ऊर्स समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 कोरोनाच्या उपाय योजनाच्या नियमांचे पालन करत उत्सव साजरे करावेत.कोणत्याही सामाजिक,धार्मिक भावना दुखाल्या जाणार नाहीत असे वर्तन कुणाकडूनही होता कामा नये, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, समाज माध्यामातून कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे मेसेज फिरवू नये, असे कुणाच्या लक्षात आल्यास त्याची पोलिसांना कल्पना द्यावी,असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी दोन्ही उत्सवाच्या मार्गावरील स्वच्छता, अतिक्रमण,विजेचे डिपी आणि इतर आडचणी दूर करण्याच्या आदेश नगर पालिका प्रशासनास देण्यात आले आहेत. मी स्वत: या मार्गाची पाहणी करणार आहे दर्गा परीसरात दुकाने उभी करून तेथे येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही यांची दक्षता घेण्याचेही आदेश दिले आहेत. या उत्सवात लाठया-काठया-तलवारी आदी शस्त्र असणार नाही, याची खबरदारी उत्साव समितीने घेऊन पोलिसांना मदत करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
 दोन्ही उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. शांतता आणि सुव्यवस्था आबाधित राहील.दोन्ही समाज एकोप्याने आणि सहकाऱ्याने हा उत्सव आनंदात आणि कोणत्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेऊन साजरा करू असे आश्वासन दिले. 
       
                                                
 
Top