Views
*तलाठी शिरमोड सेवानिवृत्त झाल्याबद्दल निरोप*


कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील भाटशिरपुरा सज्जाचे तलाठी व डिकसळ नागरिकांना कुठल्याही वेळी सहज उपलब्ध होऊन अडचणी दूर करणारे श्री.शिरमोड साहेब यांचा आज सेवानिवृत्तीनिमित्त मंडळ अधिकारी कार्यालय कळंब या ठिकाणी दयावान प्रतिष्ठानच्या वतीने भरपेहराव वस्त्र,शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,
     यावेळी दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम,सामाजिक कार्यकर्ते शकील भाई काजी,उद्योजक अमर मुल्ला,सलीम बागवान, आरेफ पठाण,सचिन वाघमारे,तसेच मंडळ अधिकारी श्री.मटके साहेब व कळंब सज्जाचे तलाठी श्री. व्यंकट लोमटे साहेब, पोलीस पाटील यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता. 
Top