*१२ मार्चला कळंबमध्ये लोकन्यायालय लाभ घेण्याचे न्या. महेश ठाेंबरे यांचे आवाहन*
कळंब /प्रतिनिधी
मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दिनांक 12 मार्च 2022 रोजी तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कळंब या ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले असून या लोकअदालतीचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन येथील तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश महेश ठोंबरे यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे, बॅंकेची कर्ज प्रकरणे, चेकबाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगर परिषद येथील थकबाकीची प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगीची प्रकरणे आणि तडजोडीस पात्र असलेली फौजदारी प्रकरणे ही सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी दिनांक १२ मार्च रोजी कळंब याठिकाणी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन कोविड-१९ या आजाराच्या बाबतीत असलेल्या सर्व नियमावलीचे पालन करून करण्यात आले आहे. सदर लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने प्रकरण मिटवून घेण्यासाठी पक्षकारांनी पुढे येण्याचे आवाहन दिवाणी न्यायाधीश महेश ठोंबरे यांनी केले.