Views


*कळंब आगारात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*

 
कळंब/प्रतिनिधी

 येथील आगारात मराठी भाषा गौरव दिन म्हणून प्रवाशांना गुलाब फुल व पेढे वाटून दि २७ रोजी उत्साहात साजरा करन्यात आला ,
       या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख मुकेश कोमटवार,हे होते तर प्रमुख पाहुणे साहयक पोलीस निरिक्षक अतुल पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . जीवन वायदंडे कंळब तालूका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक , अँड. समिर मुल्ला , अँड. शंकुतला फाटक , माधवसिंग राजपुत ,कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती , स्थानकप्रमुख बालाजी मुळे , वाहतुक नियंत्रक नामदेव जगताप ,गोविंद जाधवर , सुशिल हुंबे आदी मंचावर उपस्थित होते ,
या वेळी मराठी भाषाचा आदर करावा असे अवाहन करन्यात आले ,या वेळी बस स्थानक पारिसरात काढलेली रांगोळी ने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले ,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाहक बळीराम कवडे , यांनी केले तर अभार वाहतुक नियंत्रक के . ए . कुंभार यांनी मानले ,तर कार्यक्रम पार पाड़ण्यासाठी चंद्रकांत चौरे , डी . टी .कासार, वाहक चालका सह आदीनी पारिश्रम घेतले ,
 
Top