Views



*आर्थिक मदतीसाठी जिल्हयातीलमदरसांना अर्ज करण्याचे आवाहन*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी


महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिककीकरण योजना कार्यरत आहे.या योजनेंतर्गत पात्र मदरसांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.योजना 2021-22 या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात येणार आहे.या योजनेंतंर्गत 2021-22 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी केले आहे.
    या योजनेंतर्गत 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी कालबध्द कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे-
        मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि.11 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे.नेमूण दिलेल्या वेळापत्रकानुसार उस्मानाबाद जिल्हयातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी त्यांचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत.विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.असेही जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.
                                  
 
Top