Views


*कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातर्गत14 फेब्रुवारीस रण फॉर लेप्रसी*


  उस्मानाबाद/ प्रतिनिधी


राष्ट्रीय कुष्टरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत शासनाच्या कुष्ठरोग मुक्तीकडे वाटचाल (TOWARDS ZERO LEPROSY) धोरणानुसार आरोग्य शिक्षण कार्यक्रमांतर्गत “रण फॉर लेप्रसी” या जनजागृती कार्यक्रमाचे उस्मानाबाद शहरात आयोजन केले आहे. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत दि.14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 09.00 वाजता येथील जिल्हा रुग्णालयात महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन करुन आणि हिरवी झेंडी दाखवून रण लेप्रसी हा कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय येथून शिवाजी चौकापर्यंत ही दौड करण्यात येवून शिवाजी चौक येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.असे सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा,(कुष्ठरोग) यांनी कळविले आहे.
                                           
 
Top