Views*लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेविका सौ. 
आरती सतिश गिरी यांनी प्रभागात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केल्याने नागरीकांतुन समाधान*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेविका सौ. आरती सतिश गिरी यांनी सामाजिक भावना जपत प्रभागात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केल्याने नागरीकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रभातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडूनच सूचना अभिप्राय लेखी स्वरूपात घेऊन व सदर उपक्रमाबाबत समस्या सोडविण्यासाठी भाजपाचे नेते आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील, दयानंद गिरी, यांच्या मार्गदर्शनाखाली व नगर पंचायत लोहारा यांच्या वतीने याचा पाठपुरावा 15 दिवसाला करण्यात येणार आहे. नगरसेविका सौ.आरती गिरी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केल्याने शहरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top