Views*लोहारा नगर पंचायत शिवसेना गटनेते पदी सौ. सारिका बंगले तर राष्ट्रवादीच्या गटनेते पदी जालिंदर कोकणे*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


लोहारा नगर पंचायतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेवकांच्या गटनेत्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेना गटनेते पदावर सौ.सारिका प्रमोद बंगले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदावर जालिंदर कोकणे यांची नेमणूक करण्यात आली. लोहारा नगरपंचायतीवर शिवसेना राष्ट्रवादी युतीची सत्ता आली आहे. 17 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत 11पैकी 9 जागेवर शिवसेनेचे तर 6 पैकी 2 जागेवर राष्ट्रवादी चे उमेदवार निवडून आले आहे.
यावेळी अपक्ष नगरसेवक आमीन सुबेकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा न.प.माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवासेना उपजिल्हा प्रमुख नामदेव लोभे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी नगरसेवक अबुलवफा कादरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा नगरसेवक आयुब शेख, शब्बीर गवंडी, आयुब अब्दुल शेख, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी पं.स.सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, ओम कोरे, गौस मोमीन, नगरसेविका वैशाली अभिमान खराडे, मयुरी अमोल बिराजदार, शामल बळीराम माळी, कमल राम भरारे, सुमन दीपक रोडगे, शमाबी आयुब शेख, आरती ओम कोरे, प्रमोद बंगले, शम्मु भोंगळे, यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top