Views


*प्रहार शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नारायण घोडके*उस्मानाबाद/प्रतिनिधी


प्रहार शिक्षक संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी नारायण घोडके यांची निवड करण्यात आली आहे. लोहारा शहरात
 प्रहार शिक्षक संघटनेची बैठक राज्य प्रवक्ते दत्तात्रय पुरी यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे उपस्थित होते.
संघटनेच्या विद्यार्थी प्रथम, समाजहित, शिक्षकाचे प्रश्न व मा. बच्चू भाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरीत होऊन लोहारा शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून नारायण घोडके, सचिव म्हणून गजानन शिंदे, उपाध्यक्ष सदाशिव रोकडे तर जिल्हा महिला संघटक म्हणून उलन कांबळे यांची निवड करण्यात आली. यावेळी विकास घोडके, भिमाशंकर डोकडे, गणेश गोरे, शिवलींग कोरे उपस्थित होते. या निवडिबधदल गणेश काळे, पंडीत राठोड, राजू माळवदकर, अरुण तपसाळे, दिपक पोतदार
महादेव कांबळे, गणेश वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top