Views


*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अमर चोंदे तर उपाध्यक्षपदी खादीम सय्यद यांची निवड*

कळंब/प्रतिनिधी

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना उस्मानाबाद अंतर्गत कळंब तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची तर उपाध्यक्ष खादिम सय्यद,सचिवपदी संदीप कोकाटे ,जिल्हा कार्यकारिणीच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड.मनोजकुमार थोरात यांची नियुक्ती करण्यात आली.
      
     यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रा.सतिश मातने सचिव रमेश अंबिरकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य बालाजी सुरवसे व ओंकार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती पत्रे देण्यात आली. सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. 
 
Top