*सार्वजनिक आणि खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची*
*त्रैमासिक माहिती सादर करण्याबाबत आवाहन*
उस्मानाबाद /प्रतिनिधी
डिसेंबर 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाद्वारे चालू आहे. सर्व आस्थापनाकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2022 आहे. विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे आणि कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सं.रा.गुरव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री-पुरुष आणि एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकित कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमीतपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडून यापूर्वीच युजर नेम आणि पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करुन आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02472-222236 किंवा ई-मेल आयडी osmanabadrojgar@gmail.com अथवा asstdiremp.osmanabad@ese.maharashtra.gov.in यावर उद्योजक नोंदणी क्रमांक आणि इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.