Views


*जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या*
*प्रस्तावांना 15 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

 चेन्नई येथील राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांनी 2013 पासून जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती, संस्था, विभाग, जैवविविधता समिती (BMC) करिता राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार योजना घोषित केली आहे. तेंव्हापासून जैवविविधता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था, व्यक्ती, विभाग, जैवविवधता समित्यांना (BMC) रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. यावर्षीसुध्दा चेन्नई राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांनी 2023 करिता वरील गटातून नामांकन करण्याबाबत आवाहन केलेले आहे. सुरुवातीला स्पर्धेत भाग घेण्याची तारीख दि. 15 नोव्हेंबर 2021 होती. तथापि, जास्त लोकांनी या पुरस्कार येाजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत दि.15 जानेवारी 2022 पर्यंत वाढवलेली आहे. 
स्पर्धेमध्ये इच्छुक व्यक्ती, संस्थेकरिता वर्गवारी-1 मध्ये जैविक संसाधनाचे संवर्धन आणि शाश्वत वापर,वर्गवारी-2 मध्ये उत्कृष्ट जैवविविधता व्यवस्थापन समिती,वर्गवारी-3 मध्ये योग्य आणि समन्यायी लाभांश वाटप, वर्गवारी-4 मध्ये उत्कृष्ट लोक जैवविविधता नोंदवही याप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे.
प्रत्येक वर्गवारी मध्ये प्रथम क्रमांकाला पाच लाखांचे रोख रक्कमेचे बक्षीस आहे.तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच इतर उत्कृष्ट व्यक्ती, संस्था, विभाग आणि जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना (BMC) प्रत्येक वर्गवारीमध्ये इतर प्रोत्साहनपर रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. संबंधितांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन या पुरस्कार योजनेमध्ये सहभागी व्हावे आणि त्यांचे प्रवेश अर्ज परस्पर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण,चेन्नई यांच्या www.nba.gov.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन फॉर्म डाऊनलोड करुन तसेच राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, चेन्नई यांच्या INDIAN BIODIVERSITY AWARDS bdawards2023@nbaindia.in या मेल आयडी वर पाठवावे आणि अधिकच्या माहितीकरिता महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर यांच्या कार्यालयाच्या ईमेल msbb.ngp@gmail.com दूरध्वनी क्र.0712-2522982/84 संपर्क साधावा.असे आवाहन जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रांप) नितीन दाताळ यांनी केले आहे.

 
Top