Views*नीति आयोगाच्या निर्देशांकांची पूर्ती करण्यासाठी नव्यने सर्वांकाश आराखडा तयार करा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे निर्देश*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील चार जिल्हयांपैकी उस्मानाबाद हा एक आकांक्षीत जिल्हा आहे.या अनुषंगाने केद्र शासनाच्या निती आयोगाने निश्चित केलेल्या निर्देशांकांची उदिष्ट पूर्ती करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नव्यने सर्वांकश आराखडा तीन आठवडयात तयार करून पाठवावा,असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनीआज दिले.
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमातंर्गत नीति आयोगाच्या निर्देशांकांच्या अनुषंगाने डॉ.कराड यांनी आज व्हि.सी.व्दारे जिल्हयातील संबंधित योजनांचा आढावा घेतला,तेव्हा ते बोलत होते.या बैठकीस आमदार सर्वश्री सुजितसिंह ठाकूर,राणाजगजितसिंह पाटील, जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नीति आयोगाचे संचालक राकेश रंजन, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे ,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, लीड बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर आदी उपस्थित होते .
  उस्मानाबाद जिल्ह्याचा शिक्षण,आरोग्य,अर्थ, कौशल्य विकास यासह पायाभूत सुविधा विकास याबाबत करावयाच्या उपाययोजणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी जिल्ह्यात प्रलंबित असलेली मुद्रा लोनची प्रकरण तसेच महिला बचत गटांना द्यावयाच्या कर्जाच्या प्रस्तावांचा निपटारा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.उस्मानाबाद जिल्ह्यात अर्थसाक्षरता संदर्भात जनजागृती करावी,उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वदूर ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांची आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा काढण्याचे प्रस्ताव सादर करावेत , किसान क्रेडिट कार्ड योजनेसंदर्भात तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी शेळी - मेंढी पालन , मच्छ व्यवसाय आणि शेतीपूरक उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
 आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमातंर्गत नीति आयोगाने निश्चित केलेल्या सहा क्षेत्रातील 49 निर्देशांकांमध्ये वृध्दी होण्यासाठी जिल्हयात विविध योजना, कार्यक्रम तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.याबाबत झालेली प्रगती नीति आयोगाने विकसित केलेल्या डॅशबोर्डवर दिसून येतो . आकांक्षित जिल्हयासंबंधिचा उस्मानाबादचा आराखडा-2018 मध्ये तयार केला होता.त्यानंतर काही नवीन निर्देशांकांची आणि उपक्रमांची भर पडल्याने पुन्हा सर्वंकश आराखडा तयार करण्याची गरज आहे, त्याबाबत जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी आजच्या सादरीकरणातून जिल्हयातील कामांची माहिती दिली. आमदार श्री .पाटील , श्री .ठाकूर आणि श्रीमती कांबळे यांनी सोलापूर -- उस्मानाबाद रेल्वे मार्ग , उस्मानाबाद येथील एमआयडीसीत टेक्स्टाईल पार्कची निर्मिती , तुळजापूरसह जिल्ह्याचा पर्यटन विकास ,अधिकारी -- कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे आदी विषय मांडले , यात लक्ष घालण्याचे आश्वासन डॉ कराड यांनी यावेळी दिले .

 
Top