Views


*प्लास्टिकचे ध्वज वापरण्यावर बंदी*
       
उस्मानाबाद/प्रतिनिधी

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठया अभिमानाने मिरवले जातात,मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर,कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात.प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत.त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते.राष्ट्रध्वजाची ही विटबंना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका क्र.(103/2011) दाखल करण्यात आली होती.या विषयी सुनावणी करताना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले.त्यानुसार केंद्रीय अन्न राज्य गृह विभाग,तसेच शिक्षण विभाग यांनी या विषयीचे परिपत्रकही काढले आहे.
  महाराष्ट्र शासनानेही राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने त्यानुसारही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे हे कायद्याविरोधी आहे.यंदा दुकानातून तसेच ऑनलाईन पध्दतीने तिरंग्याच्या रंगातील मास्कची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.अशोकच्रकासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे.असे करणे हे राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950 कलम 2 व 5 नुसार तसेच राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार आणि बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 या तिन्ही कायद्यानुसार दंडणीय अपराध आहे.असे तहसीलदार यांनी कळविले आहे.
                                          
 
Top