Views




*कळंब आगारातून अखेर बस फेऱ्यात वाड तर लांबपल्याच्या बस सेवा सुरू..!*


 कळंब/प्रतिनिधी


 येथील बस आगारात १४५ कामगार कामावर तर १५ कर्मचारी सेवेतुन बडतर्फ केले आसुन ३१ कर्मचारी निलंबीत केले आहेत . कळंब आगारातून लांबपल्याच्या बस देखील सुरु झाल्या आहेत. अशी माहिती आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांनी दिली आहे. उस्मानाबाद बस विभागात २७०० कर्मचारी संख्या आहे त्यात २३८ निलंबीत आसुन १२५ सेवेतुन बडतर्फ केले आहेत त्या पैकी कळंब आगारात एकुन ४८७ कर्मचारी आहेत. त्या पैकी संपातुन माघार घेऊन ४२ चालक, ४९ वाहक ,यांत्रिकी २८,प्रशासकिय २८,तर ४ चालकासह एकुन ६ कर्मचा-यांच्या बदल्या केल्या आहेत. व असे एकुन १४५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.तर ३१ कर्मचा-यांना कारणेदाखवा नोटीस बजाऊन निलबींत केले आहे. दिवसाखेर २९ बसेसने विविध मार्गावर जवळपास ७० फेऱ्या पूर्ण केले आहेत या फेऱ्यायांना प्रवासातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
 कळंब आगार गेल्या दोन महिण्या पासून एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यापैकी काही कर्मचारी आज ही आंदोलनावर ठाम आहेत, तर काहींनी संपातून माघार घेऊन कामावर हजर झाले आहेत. तर कळंब आगारातुन आखेर सकाळी ७ वाजता पूणे साठी एक बस , तर उस्मानाबाद , येरमाळा, बार्शी, वाशी , मोहा मार्गे उस्मानाबाद ,अंबाजोगाई, पारा, केज ,सकाळी ६ पासुन रात्री ७ पर्यंत आहेत तर औरंगाबाद साठी ३ बसेस सोडण्यात येत आहेत अशा एकूण २९ बसेस द्वारे ८०२४ कि. मी. च्या ७० फेऱ्या पूर्ण करून या द्वारे मंडळाला २ लाख ४६ हजार ८९४ रूपयाचे उत्पन्न जवळपास दर दिवसाकाठी मिळत आहे.बस सेवा चालू झाल्यामुळे प्रवासातून व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. तर कामावरती आलेल्या कर्मच्याऱ्यांना काही कर्मचारी टोमने मारतात अपमानित करतात त्या मुळे त्यांची मानसिकता ढळते, यावर महामंडळाने सवरक्षणाची सोय केली नसल्याने कामावर हजर झालेले कर्मचारी तीव्र नाराजी व्यकत करत आहेत. बाजारपेठेत आज वर्दळ वाढली आहे तरी प्रवाशांनी खाजगी वाहनाचा वापर न करता बसने प्रवास करावा . येत्या दोन दिवसात बस सेवा सुरळीत चालू होईल असे अवाहन स्थानक प्रमुख बालाजी मुळे यांनी दिली आहे. 




      चौकट 

कर्मचाऱ्यांनी कामावर वेळेत हजर होऊन आपल्या वरील आलेले संकट टाळावे.
 आगार प्रमुख मुकेश कोमटवार .


         चौकट 

महामंडळ प्रशासने कर्मचाऱ्याची कमतरता लक्षात घेऊन अधीकाऱ्यानी लाईनवर काम करावे असे आदेश काढले आहेत.ते आम्ही स्वीकारून वाहक म्हणून काम करण्यास तयार आहोत . - वाहतुक निंयत्रक के. ए. कुंभार 


        चौकट

नकटीच्या लग्नाला सतराशे विध्न ! अशी आवस्था एसटी ची झाली आहे, त्यात कर्मचाऱ्याच्या अंदोलनामुळे आनेक बस ह्या नादुरूस्त आहेत. त्याचे काम पण चालू आहे . बस स्थानकावर अशी बस ढकण्याची वेळ प्रवांशावर येत आहे.
 
Top