Views*लोहारा तालुक्यातील 14 गावांची ड्रोनद्वारे 27 जानेवारीपासून मोजणी*       
उस्मानाबाद/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील शासन परिपत्रकनुसार राज्यातील सर्व गावठाणामधील जमिनीचे जी आय एस अधारित सर्व्हेक्षण आणि भूमापन करण्याबाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात देण्यात आली आहे.
   लोहारा तालुक्यातील एकूण 14 गावांचे ड्रोनद्वारे दि.27 जानेवारी 2022 पासून गावठाणातील मिळकतींचे मोजणी करुन जनतेस मिळकत पत्रिका आणि सनदा पुरविण्यात येणार आहेत,असे लोहाऱ्याचे उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी कळविले आहे. 
 
Top