Views


*51 मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

एकदा मोबाईल चोरीला गेला तर तो सापडणे कठीणच परंतु पोलिसांनी अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करीत मोबाईल चोरांना वेसण घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरी गेल्या वर्षात 13 लाखाचे मोबाईल चोरीस गेले. यापैकी साडे पाच लाखाचे मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. 51 चोरट्यांना मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
  
उस्मानाबाद जिल्ह्यात मोबाईल चोरांनी उपद्रव
मांडला आहे.बस स्थानक व आठवडी बाजार हे त्यांच्यासाठी जणू कुरणच. घाई गडबडी असलेल्या गर्दीत असलेल्या व्यक्तीवर पाळत ठेवून त्यांच्या खिशातील मोबाईल अलगदपणे चोरणाऱ्या चोरट्यांची संख्या वाढत चालली आहे. शेजारच्या जिल्ह्यातून येऊन उस्मानाबादकरांचे खिसे कापणारे चोरटे पोलिसांच्या नाकीनऊ आणत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर पर्यंत मोबाईल चोरीचे एकूण 74 गुन्हे पोलिसांच्या दप्तरी दाखल झाले होते.यापैकी 35 गुन्ह्यांचा उलगडा य तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलीसांना करता आला आहे.

दरम्यान एकूण सर्व गुन्ह्यात 13 लाख 15 हजार 479 रुपयाचे मोबाईल चोरट्याने पळविले होते. त्यातील 5 लाख 66 हजार 29 रुपये किमतीचे मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे‌ यासाठी 51 चोरट्यांचा मा काढून त्यांना करावे लागेल.


अल्पवयीन मुलेही


अल्पवयीन मुलांना प्रशिक्षित करून त्यांना आठवडी बाजारात, बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी सोडण्यात येते त्यांच्यावर त्याचा मोरक्या पाळत ठेवून चोऱ्या घडवून आणतो मुलगा सापडला तरी अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून सहजपणे सुटका करून घेता येते. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यासाठी वापर वाढला आहे.शेजारच्या जिल्ह्यातून चोरटे येतात.


मोबाईल चोरीच्या प्रकरणात स्थानिक आरोपी पेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन चोरी करणारे अधिक आहे. त्यात बीड व सोलापूर येथील आरोपींची संख्या जास्त आहे. शेजारच्या राज्यातील आरोपी आहेत मोबाईल चोरल्यानंतर ते दूर अंतरावरील शहरात किंवा परराज्यात विक्री होत असल्याने पत्ता लागला तरी तो ताब्यात घेण्यास अडचणीचा आहे.

 
Top