Views


*गावठी पिस्तूल प्रकरणी तिघांना पोलिस कोठडी*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

तुळजापूर शहरात गावठी पिस्तूल सापडल्याप्रकरणी तिघांना बुधवारी (ता. 5) पर्यंत पोलीस कोठडी देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी यांनी शनिवारी(ता.1) दिला आहे.

पोलिसांनी सांगितले की अटक करण्यात आलेल्यांमध्ये सचिन खंडू जाधव (वय 21रा.तुळजापूर), शैलेश श्रीकांत नरवडे (वय 23 मसला खुर्द, ता. तुळजापूर), मयूर बापू बनसोडे(वय 24 रा.उस्मानाबाद) यांचा समावेश आहे. वरील तिघांनाही पोलिसांनी शुक्रवारी (ता. 31) रोजी रात्री उशिरा अटक केली. यासंदर्भात फौजदार राहुल रोटे यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता. 30) तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

माहितीनुसार तुळजापूर लातूर रस्त्यावरील पाचुंदा तलावाजवळ दोन युवकाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक नेमून गुरुवारी एका अल्पवयीन मुलासह राजेंद्र कांबळे यास अटक करून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद याप्रकरणी राजेंद्र कांबळे यास शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली तर अल्पवयीन मुलास न्यायालय हजर केले असता त्याला जामिनावर सोडण्यात आले

    शहरात गावठी पिस्तूल सापडल्या प्रकरणी पोलिसांनी मागील 72 तासात तपासणी मोठी यंत्रणा सक्रिय केली आहे. तपासामध्ये पोलिसांनी शैलेश जाधव सतीश जाधव शैलेश नरवाडे मयुर बनसोडे यांची नावे निष्पन्न झालेली आहेत का नाही शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही सात दिवसाची पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयात केली होती पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण करीत आहेत.
 
Top