*खाशील का पिशील? या बहूप्रतिक्षित कॅफेचे 1 जानेवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ*
कळंब :
पत्रकार मुस्तान मिर्झा यांच्या खाशील का पिशील? या बहूप्रतिक्षित कॅफेचं शुभारंभ नवीन वर्षाच्या पहिल्या पहिल्या संध्येला होणार आहे. 1 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत खाशील का पिशीलचं उदघाटन होणार आहे. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, ज्ञान प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर आणि आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेले प्रसिद्ध वक्ते अविनाश भारती हे असणार आहे.
मुस्तान मिर्झा यांच्या आई मुमताज मिर्झा आणि वडील मुख्तार मिर्झा यांच्या शुभहस्ते फित कापून शुभारंभ करण्यात येणार आहे. यासह कळंब तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि मान्यवर मंडळी या खाशील का पिशीलचया उदघाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असणार आहेत. राज्यातील विविध मान्यवर मंडळींनी व्हिडिओच्या माध्यमातून खाशील का पिशीलला शुभेच्छा दिल्या आहेत. तशे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कळंब शहर सध्या विविध बाबतीत कात टाकताना दिसत आहे. ग्रामीण भागाच्या संस्कृतीसह शहरीकरण जलदगतीने होत आहे. शहरात सध्या विविध फ्रांचायजीसचे चहा अमृततुल्य सुरू झालेतच. काही नामांकित ब्रँडचे वस्त्र दालन देखील मोठ्या दिमाखात सुरू झालेत. तसा प्रतिसाद देखील कळंबकर देत आहेत.
त्याच धर्तीवर मुस्तान मिर्झा यांनी कळंब शहरात अतिशय सुसज्ज, सर्व सोयी असलेलं कॅफे उभं केलं आहे. या कॅफेत पिझ्झा, बर्गर, सॅन्डव्हिज यासारख्या विदेशी पदार्थासह पुणेरी मिसळ, पावभाजी यासारखे भारतात प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ देखील उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या चहा, कॉफीसह मोकटेल या प्रकारचे थंड पेय देखील या कॅफेत मिळणार आहेत. त्याचबरोबर फक्त ईदच्या निमित्ताने मिळणारा शिरकुरमा हा खाद्य आणि पेय पदार्थ 12 महिने मिळणार आहे.
महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि प्रवेश मार्ग
या खाशील का पिशील? असा आगळा-वेगळा नाव असलेल्या कॅफेत महिलांना केंद्रबिंदू मानून सुविधा देण्यात येणार असल्याची मुस्तान मिर्झा म्हणाले. सहसा कॅफेत-हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक कॉमन प्रवेशद्वार असतो. मात्र या ठिकाणी कॅफेत जाण्यासाठी महिलांना वेगळा प्रवेशद्वार करण्यात आला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी- कुटुंबियांसाठी स्वतंत्र आणि अतिशय दर्जेदार बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला आणि लहान मुलांसाठी स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था जवळच करण्यात आली आहे.
वाढदिवसासह इतर समारंभ साजरे करण्याची खाशील का पिशीलमध्ये सोय
अनेकजण आपल्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत वाढदिवस किंवा इतर समारंभ साजरे करीत असतात. त्यांच्यासाठी अशे समारंभ साजरे करण्यासाठी विविध पॅकेजच्या माध्यमातून सोय करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर विवाहित जोडप्यांना आपल्या लग्नाचं वाढदिवस, जोडीदाराचा वाढदिवस साजरा करण्याची व्यवस्था देखील इथे आहे. त्यामुळे सर्वांच्याच पसंतीला हा कॅफे उतरेल, इतकं मात्र नक्किय.
पुस्तक प्रेमींसाठी पुस्तकांची भिंत, प्रथमच असा प्रयोग, नागरिकांचा मोठा प्रतिसाद
अनेक ठिकाणी आपण पाहतो कॅफेमध्ये खाद्य पदार्थासह संगीताची मेजवानी देखील असते. मात्र खाशील का पिशील या कॅफेत प्रत्येक सेक्शनमध्ये संगीत प्रेमींसाठी स्वतंत्र म्युझिक व्यवस्था तर आहेच त्यासह वाचनप्रेमींना लक्षात घेऊन पुस्तकांची भिंत देखील कॅफेत असणार आहे. आपल्या ऑर्डरच्या प्रतीक्षेत बसताना मोकळ्या वेळेत ग्राहकांना विविध विषयांचे पुस्तके वाचता यावे, म्हणून हा प्रयोग मिर्झा यांनी आपल्या कॅफेत केला आहे.
आपल्या स्वखुशीने सर्वांनी कॅफेला पुस्तक भेट द्यावे, असे आवाहन मिर्झा यांनी सोशल मीडियावर केले होते. त्याला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी या कॅफेसाठी पुस्तके भेट म्हणूब दिल्या आहेत. त्यामुळे वाचनप्रेमींची चांगलीच सोय खाशील का पिशीलमध्ये वाचशील का? च्या माध्यमातून होणार आहे. आशा विविध प्रयोग आणि सुखसोयीसह 1 जानेवारीला सुरू होत असलेल्या खाशील का पिशील कॅफेत एकदा नक्की भेट द्या, असे आवाहन कॅफे मालक मुस्तान मिर्झा यांनी केले आहे.