*आनंदनगर डाक कार्यालयाच्या*
*भाडे तत्वावरील जागेसाठी आवाहन*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
डाक कार्यालयासाठी आनंदनगर परिसरामध्ये भाडेतत्त्वावर जागा मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.आनंदनगर डाक कार्यालयासाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी अर्ज करताना खालील प्रमाणे नियम आणि अटी लागू करण्यात येत आहेत.
आनंदनगर पोस्ट ऑफीससाठी जागा देताना ती आनंदनगर परिसरात असणे आवश्यक आहे, जागा ही तळमजल्यावर असावी. लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यासाठी सोयीस्कर असावी, जागा ही कमीत कमी ५५० .sq.ft.असावी, जागा भाड्याने देण्यासाठी अर्ज करताना सोबत बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता पत्रक आणि आधार कार्ड जोडण्यात यावा,अर्ज करताना तो बंद पाकीटात घालून डाक अधीक्षक विभाग मुख्यालय लातूर- ४१३५१२ यांच्या नावे करण्यात यावा, अर्ज करताना अर्जामध्ये अपेक्षित भाड्याचा उल्लेख करावा, पोस्ट ऑफीस बरोबर पाच वर्षाचा करार करणे आवश्यक आहे. अर्ज दि. १४ जानेवारी-२०२२ पर्यंत मिळेतील अशा स्वरुपात वेळेत पाठवावेत, असे आवाहन डाक अधीक्षक उस्मानाबाद विभाग मुख्यालय लातूर यांनी केले आहे.