*सुकन्या समृध्दी योजना पंधरवाडाचे भारतीय डाक विभागातर्फे आयोजन*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
भारतीय डाक विभाग यांच्यावतीने बालिका दिन दि.24 जानेवारीनिमित्त दि.17 ते 31 जानेवारी 2022 पर्यंतच्या कालावधीत सुकन्या समृध्दी योजना पंधरवाडाचे आयोजन करण्यात आला आहे.यामध्ये वय वर्षे 0 ते 10 वयोगटातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.250 रुपयांनी खाते उघडण्याची सुविधा यामध्ये समाविष्ट असेल.
उस्मानाबाद विभागाअंतर्गत सर्व पोस्ट ऑफीसमध्ये हा पंधरवाडा आयोजित केला आहे.तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा समाजसेवकांनी आयोजित केलेल्या सुकन्या समृध्दी योजना पंधरवाडामध्ये जास्ती जास्त खाते उघडण्यास मदत करावी आणि आपल्या भागातील बलिकाचे भविष्य उज्वल करण्यास मदत करावी.
उस्मानाबाद आणि लातूर जिल्हयातील सर्व नागरिकांनी आयोजित सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर,उस्मानाबाद डाक विभाग यांनी केले आहे.