Views

*मुख्याध्यापकांचे जापनीज मेंदुज्वर*
*लसीकरणाबाबत प्रशिक्षण यशस्वी*

          
उस्मानाबाद /प्रतिनिधी


जिल्हा रुग्णालयात राम नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील शाळांतील मुख्याध्यापकांसाठी जापनीज मेंदुज्वर लसीकरण प्रशिक्षण आज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
             जिल्ह्यात दि.03 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये एक वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील AES (Acute Encephalitis Syndrome) या आजाराने होणारे मृत्यू रोखण्याकरिता सर्व शालेय आणि शालाबाह्य मुलांसाठी जे.ई. (Japanese Encephalitis) Vaccination Campaign Operational Guidelines लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम सर्व शाळेमध्ये राबविण्यात येत असल्याने येथील मुख्याध्यापकांना या मोहीमे विषयी माहिती देण्याकरिता मुख्याध्यापकांसाठी आज प्रशिक्षण जिल्हा रुग्णालयात CHO हॉलमध्ये घेण्यात आले.यात कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक सहभागी झाली होते. जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.के.के. मिटकरी, SMO मुंबई डॉ.काटकर आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दोनचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.ए. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.  
         या प्रशिक्षणास रामनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दोन येथील कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते.

 
Top