Views


*राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत*
*अटल भूजल योजनेबाबत प्रशिक्षण सुरू*

  उस्मानाबाद/प्रतिनिधी      

   
 उस्मानाबाद येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, महाविद्यालयाच्या हॉलमध्ये पंचायत समिती विस्तार अधिकारी अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेची सुरुवात आज करण्यात आली .                   
                या कार्यशाळेत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने अटल भूजल योजने विषयी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेस भेट देऊन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी अटल भूजल योजनेतील असलेल्या 55 गावांतील जलसंधारणाच्या कामांचे अभिसरण व्हावे, या दृष्ठीकोणातून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत आराखडयात समावेश करुन प्रभावी अंमलबजावणी करावी. ज्या गावांत कामे सुरु तेथील कामांची पाहणी करण्यासाठी क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले.    
             प्रशिक्षणात उपस्थित ग्रामसेवक आणि सरपंच यांना वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 2021-2022 अंतर्गत आमचं गाव,आमचा विकास (GPDP) 2022-2023 या ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने अटल भूजल योजनेतील गावांचा समावेश या आराखडयात करण्यात यावा तसेच सदयस्थितीतील अटल भूजल योजने अंतर्गत होत असण्या-या कामांचा प्राधान्यक्रमाने समावेश व्हावा , यासाठी योजनेची आणि कामांची सविस्तर माहिती दिली . यावेळी सहा.भूवैज्ञानिक श्रीमती. डॉ.मेघा. एस. शिंदे यांनी योजनेतील जलसुरक्षा आराखडा बाबत माहिती दिली आणि यापुढील कामांचे नियोजन करताना एक केंद्राभिमुखता या संकल्पनेचा वापर करुन जास्तीत जास्त कामे, मागणी आधारीत कामे (पाणी बचतीच्या उपाययोजना) आणि पुरवठा आधारीत कामे (जलसंधारण उपाययोजना) या कामांचा समावेश आराखडयात होणे अपेक्षीत आहे, असे सांगितले. जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेतील विजयकुमार माने यांनी जलसुरक्षा आराखडयातील समाविष्ठ करावयाच्या कामांबाबत माहिती दिली. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे वैभवराज गायकवाड, अमोल बाराते, ब्रम्हदेव माने उपस्थित होते.

 
Top