*महिला लोकशाही दिनाचे*
*चौथ्या सोमवारी तहसीलमध्ये आयोजन*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांचे हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी आणि समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रभावी उपाय योजना म्हणून दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी सकाळी ठिक 11.30 वाजता तहसीलदार यांच्या दालनामध्ये महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते.
उस्मानाबाद तालुक्यातील समस्याग्रस्त आणि पीडित महिलांनी महिला लोकशाही दिनास उपस्थित राहून विहित अर्जाद्वारे आपल्या समस्या मांडाव्यात असे अध्यक्ष तथा तहसीलदार, सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी कळविले आहे.