*माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी*
*प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील केंद्रीय सैनिक बोर्ड, रक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडील दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2021-2022 करीता प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा यांनी त्यांच्या पात्र पाल्यांचे अर्ज www.ksb.gov.in या वेबसाइटवर भरून त्याची प्रिंट प्रत (printed copy) तात्काळ येथील जिल्हा सैनिकी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.