*शासकीय वस्तीगृहासाठी वस्तुंच्या*
*दरपत्रक पाठविण्याचे आवाहन*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत उस्मानाबाद येथील सहाय्यक आयुक्त समाज-कल्याण यांच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलां -मुलींच्या शासकीय वसतीगृहासाठी आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी पुढील बाबींसाठी एकत्रित दरपत्रके (बंद पाकीट)दि.9 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावीत,असे आवाहन सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.
अन्नधान्य,किराणा,कडधान्य पुरवठा.फळे,भाजीपाला,दुध,अंडी,मटन आणि चिकन पुरवठा.स्टेशनरी पुरवठा करण्यासाठी,भोजन पुरवठा करण्याच्या साहित्यासाठी (अ.क्र.1,2व 4 करिता) पुरवठा धारकाकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे वैद्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. पुरवठा करावयाच्या साहित्याची यादी तसेच इतर तपशिलसाठी येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.विहित मुदतीनंतर प्राप्त दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही,याची पुरवठा धारकांनी नोंद घ्यावी,असेही आवाहन श्री.अरवत यांनी केले आहे.