Views


*मस्सा खं येथे अंगणवाडीमध्ये " मुठभर धान्य " उपक्रम*


कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील मस्सा खं येथे अंगणवाडी मध्ये मूठभर धान्य या अभियानांतर्गत शाळेतील लहान मुलांना पोषण आहाराचा आधार लोकवर्गणीतून मिळण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी गावभर हिंडून अन्नधान्य गोळा केले व या उपक्रमा अंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील लहान मुलांना गोपाल पंगत तसेच स्तनदा माता , गरोदर महिला व किशोरवयीन मुली यांना पोषण आहार देण्यात आला . यावेळी उपसरपंच विश्वनाथ तांदळे व अंगणवाडीच्या प्रवेशिका मोमीन तसलीम कार्यकर्ते व मदतनीस शिंगटे विमल , कलावती पुरी , तारामती हरणे ,बायडाबाई शिंदे ,मंजुषा मोरे ,आरती माळी तसेच आशा कार्यकर्ती व महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या
 
Top