Views


*दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब येथे लोकअदालत संपन्न...*


कळंब/प्रतिनिधी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ११ डिसेंबर, २०२१ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब याठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालतीमध्ये एकुण तीन पॅनल नियुक्त करण्यात आलेले होते. पॅनल क्रमांक एक साठी श्री. महेश ठोंबरे दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब हे पॅनल प्रमुख तर अॅड. श्री. एस. एस. शिंदे व अॅड. श्रीमती पी. आर. कांबळे यांची पॅनल पंच म्हणून नियुक्ती कण्यात आलेली होती. तर पॅनल क्रमांक दोन साठी श्री. महंतेश कुडते सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब हे पॅनल प्रमुख तर अॅड. श्री. एस. ए. तळेकर व अॅड. श्रीमती एस. आर. फाटक यांची पॅनल पंच म्हणून नियुक्ती कण्यात आलेली होती. तसेच पॅनल क्रमांक तीन साठी श्रीमती आर. आर. कुलकर्णी मॅडम दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब हे पॅनल प्रमुख तर अॅड. श्री. ए. एस. पडवळ व अॅड. श्रीमती ए. डी. कांबळे यांची पॅनल पंच म्हणून नियुक्ती कण्यात आलेली होती.
  सदरील लोकअदालतीमध्ये तिन्ही पॅनलकडील ठेवण्यात आलेल्या एकुण ४२८ दिवाणी प्रकरणांपैकी ११३ दिवाणी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच विविध स्वरुपाच्या एकुण ४११ फौजदारी प्रकरणांपैकी एन. आय. अॅक्ट १३८ ची १२ प्रकरणे तर इतर १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर गुन्हा कबुलीच्या एकुण ९५ प्रकरणांपैकी ३७ प्रकरणामध्ये रक्कम रुपये ३०१००/- इतकी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे सदरील लोकअदालतीच्या दिवशी विविध बॅंका, पतसंस्थांमार्फत एकुण ९८८ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) ची प्रकरणे सादर करण्यात आलेली होती, त्यापैकी एकुण २३ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये भारतीय स्टेट बॅंक व महाराष्ट्र ग्रामीण बॅंक यांचेमार्फत न्यायालयासमोर एकुण रक्कम रुपये २४,४१,१९०/- इतकी रक्कम वसुल करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीतर्फे देण्यात आली. सदरील लोकअदालतीमध्ये विधीज्ञ मंडळातील सर्व विधीज्ञांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिल्याने लोकअदालतीचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडणे शक्य झाले. तसेच लोकअदालतीचे कामकाज पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.
 
Top