*शैक्षणिक आर्थिक मदतीसाठी*
*अर्ज करण्याचे आवाहन*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील केंद्रीय सैनिक बोर्ड, रक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडील आदेशानुसार, शैक्षणिक वर्ष 2020-2021 करीता शैक्षणिक आर्थिक मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 जानेवारी 2022 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा यांनी त्यांचे पात्र पाल्यांचे अर्ज www.ksb.gov.in या वेबसाइटवर भरून त्याची प्रिंट प्रत (printed copy) तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.