Views


*परंडा पोलिसांनी केला 60 हजार रुपयांचे 4 किलो गांजा जप्त*

परांडा /प्रतिनिधी 

तालुक्यातील घारगाव शिवारात गांजाची वाहतूक करणाऱ्या एकास परंडा पोलिस पथकाने ताब्यात घेऊन 60 हजार रुपये किमतीचे 4 किलो गांजा जप्त केला ही कारवाई गुरुवारी रोजी करण्यात आली

परंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे गुरुवारी (दि.9)हवालदार कळसाईत, कोगुलवार,शेंदारकर,चालक रोटे यांचे पथक तालुक्यातील जवळा शिवारात पहाटे चारच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. वांगी येथील पांडुरंग टकले हा दुचाकीवरून जवळा येथून ढगे पिंपरी कडे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचला. यावेळी पांडुरंग टकले टकले हा विना नंबरच्या दुचाकीवरुन घारगाव शिवारात पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याने दुचाकीवरील गोणीत गांजा असल्याची कबुली केले. पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, नायब तहसीलदार सुजित वाबळे, वरिष्ठ लिपिक पमुलाल डावरे, अण्णासाहेब बनसोडे, चालक केरबा कांबळे, दिलीप पवार, महिला पोलीस नाईक जिज्ञासा पायाळ यांनी पंचनामा केला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग टकले याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
 
Top