Views










दहिफळ येथील श्री खंडोबा यात्रेच्या सांगता दिवशी पहिल्या छायाचित्रात निकाली कुस्ती लावताना आमदार कैलास पाटील तर दुसऱ्या छायाचित्रात गावकऱ्यांनी केलेले सोंग. (छायाचित्र : योगीराज पांचाळ, दहिफळ)

*दहिफळ येथे रंगला जंगी कुस्त्यांचा व सोंगाचा कार्यक्रम*


कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील दहिफळ येथील खंडोबा यात्रेनिमित्त शुक्रवार ता.१० रोजी जंगी कुस्त्यांचे व सोंगाचे आयोजन करण्यातील आले होते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भव्य सोंगाचा कार्यक्रम असतो -या वर्षी विविध सोंगे नटविण्यात आली होती. 
यामध्ये पोतराज, शंकर पार्वती गणपती, वाघ्या मुरुळी,राजाराणी, नवनाथ, विठ्ठल, भक्त पुंडलिक, आदिवासी, असे सोंगे गावातील स्थानिक कलाकारांनी साकारली होती.या मध्ये, विठ्ठल भातलवंडे, दीपक दत्ता भातलवंडे, पिंटू जोशी, चंद्रकांत जोगदंड, चंद्रशेखर पाटील, बापू भातलवंडे, गणेश मते, फुलचंद पाटील, सुधाकर मते, बाबा भातलवंडे, रवी भातलवंडे, प्रशांत भातलवंडे, इस्माईल शेख, हनुमंत भुसारी सर्व कलाकारांचा सहभाग होता.
खास सोंगे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

 सोंगाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर जंगी कुस्त्यांचा खेळ पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात कुस्तीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शेवटीची कुस्ती लावण्यात आली. 
 
यावेळी कुस्त्या खेळण्यासाठी तेरखेडा, येडशी, सापनाई, तेर, आळणी, दहिफळ येथील मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी यात्राकमिटीचे अध्यक्ष चरणेश्वर पाटील, प्रवीण पाटील, समाधान मते, हरिश्चंद्र भातलवंडे, प्रशांत भातलवंडे, प्रदिप भातलवंडे, सुधीर मते, बालाजी मते, उपसरपंच अभिनंदन मते यांनी परिश्रम घेतले.

 
Top