Views


*उमरगा पोलिसांनी २२ लाख१६ हजार रुपये किमतीचा तंबाखू मिश्रित सुगंधी सुपारी, गुटखा पकडला*


 उस्मानाबाद/प्रतिनिधी



जिल्ह्यातील उमरगा शहर हे आंध्रा प्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील गाव हैदराबादहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित आयशर टेंपोला पकडून २२ लाख१६ हजार रुपये किमतीचा तंबाखू मिश्रित सुगंधी सुपारी, गुटखा पकडण्यात उमरगा पोलिसांना यश आलं आहे.
   जिल्ह्यातील उमरगा शहर हे आंध्रा प्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील गाव हैदराबादहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित आयशर टेंपोला पकडून २२ लाख १६ हजार रुपये किमतीचा तंबाखू मिश्रित सुगंधी सुपारी, गुटखा पकडण्यात उमरगा पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत टेम्पोसह एकूण २७ लाख १६ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल उमरगा पोलिसांनी सापळा रचून जप्त केलाय.
   उमरगा तालुक्यातील तलमोड शिवारात 4-5 च्या दरम्यान उमरगा पोलिसांनी ही कारवाई केली. उमरगा पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद यांना गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीवा जैन, उपविभागीय अधिकारी रमेश बरकते आणि पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश क्षीरसागर यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड शिवारात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर नजर ठेवली.
   दरम्यान, दुपारी चार-पाचच्या सुमारास हैदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेंपो एमएच २४ जे ७४५६ अडवून टेंपो चालकाकडे चौकशी केली. सुरुवातीला टेंपो चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे टेंपोचालक व टेंपोची कसून तपासणी केली असता तपासणीमध्ये गुटख्याची ४५ गोणी आढळून आल्या. त्यामध्ये जवळपास २२ लाख १६ हजार १६० रुपयांचा बनावट गुटखा सापडला आहे. टेंपोची किंमत अंदाजे ५ लाख आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीत एकूण २७ लाख १६ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेंपोचालक लक्ष्मण रोहिदास राऊत, राहणार अनाळा ता. परंडा याला ताब्यात घेतले असून यासंबंधी अन्नभेसळ अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आले आहे.
 
Top