Views


*मद्यपानामुळे, चारित्र्यावर संशयामुळे जोडप्यांत आले दुरावा*

*संशयाने कालवले सुखी संसारात विष!*

*भरोसा सेल ने 249 संसारामध्ये पुन्हा फुलले हास्य*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

सध्या च्या तंत्रज्ञान युगात मोबाईल फोन हे लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत जिवांन आवश्यक बनला आहे. यामुळे अनेकांचे संसार हे मोडण्याच्या उंबरठ्यात असतो. संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारच पण हल्ली या भांड्याचा किलकिलाट कोणीही सहन करायला तयार नाही.परिणामी सुखी संसारात जोडप्यांमध्ये टोकाचे मतभेद होऊन हे वाद होऊन पोलिसांपर्यंत जाण्याचे प्रकार वाढले आहे

चालू वर्षात पोलिसांच्या भरोसा सेलकडे 466 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक प्रकरणात तडजोड झाली. हे त्यातल्या त्यात समाधानाची बाब मानावी लागेल. संसाराचा गाडा हाकताना छोट्या-मोठ्या गोष्टीवरून जोडप्यांमध्ये तक्रारी होतच असताना. परंतु हल्ली एकमेकांवरील संशय हे या तक्रारीचे प्रमुख स्वरूप बनले आहे. त्यामुळे माघार घ्यायला कोणीच तयार नसल्याने जोडप्यातील वाद पोलिसांपर्यंत आहेत. तिचा फोन सारखच बीझी लागतो, ते कायम मोबाईल वर चॅटिंग करत असते, तो सातत्याने दारू पिऊन येतो, त्या चे बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे अशा प्रकारच्या तक्रारी आहेत.

यातील सर्वाधिक प्रकरणे हे चारित्र्यावर संशय घेणारी आहेत यामुळे जोडप्यात निर्माण झालेल्या अंतर कमी करण्याच्या दृष्टीने पोलीसांच्या भरोसा सेल मधील समूपदेशक प्रयत्न करीत आहे.


माहेर कडील मंडळी चे हस्तक्षेप


मुलीच्या संसारात माहेर कडील मंडळी हस्तक्षेप करीत असल्याच्याही प्रकाणे वाढत आहेत. तिकडच्या लोकांचे ऐकूनच मुलगी वागते याचा त्रास होतो, अशा तक्रारीही जोडप्यांच्या वादातील आहेत.




उच्चशिक्षित जोडप्यांमध्ये संशयाचे भूत

चारित्र्यावर संशय घेऊन होणारे वाद हे सर्वसामान्यांच्या घरी होता असे नाही हल्ली उच्चशिक्षित जोडप्यांमध्ये ही हे प्रमाण वाढत चालल्याचे प्राप्त तक्रारी वरून लक्षात येत आहे.



मोबाईल मुळे चारित्र्यावर संशय

मोबाईल हाही एक जोडप्यांच्या वादातील प्रमुख कारण बनला आहे. कोणाशी तरी लपून बोलणे, चॅटिंग करणे असा संशय एकमेकांवर घेऊन वाद घालणाऱ्या जोडप्यांच्या तक्रारीही वाढले आहे



पुरूषांचा ही होतो जाच

भरोसा सेल कडे सर्वाधिक तक्रारी या महिलांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिल्या गेल्या आहेत मात्र आता काही प्रमाणात पुरुषही बायका आपला जात करत संशय घेऊन त्रास देतात अशा ही पाच ते सहा तक्रारी पुरुषांनी भरोसा सेल कडे केले आहेत.


249 संसारामध्ये पुन्हा फुलले हास्य

1 जानेवारी 2021 पासून आज तागायत भरोसा सेल कडे एकूण 466 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

तक्रारदार जोडप्यांचे समुपदेशन करून भरोसा सेल 249 जोडप्यांच्या संसारात पुन्हा हास्य फुलविले आहे.
 
Top