Views


*नागरिकांसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित- पोलीस उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील*



तुळजापूर/प्रतिनिधी

ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 1800 270 3600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना काॅल स्वरुपात तात्काळ ऐकवला जाणार आहे. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्‍य होणार आहे.

शहरातील पोलीस संकुलन येथे आयोजित कार्यक्रमात ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद ,पुजारी मंडळाचे अध्यक्ष साळुंके आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डि.के. गोर्डे यांनी प्रात्यक्षिक दाखविले. पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 1800 270 3600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवायला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्‍य होणार आहे.
 कार्यक्रमाला तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीत सर्व 35 गावामधील पोलीस पाटील,सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे, बसवेश्वर चनशेट्टी उपस्थित होते.
 
Top