Views


*शासकीय वसतीगृहातील प्रवेशासाठी*
*16 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
         
उस्मानाबाद/ प्रतिनिधी


जिल्हयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्यरत मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृहात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांसाठी रिक्त असलेल्या जागेवर आठवी, अकरावी तसेच बारावी नंतर पदवी,पदविका,पदवीव्यूतर प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दि १६ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रवेशासाठी अर्ज शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल यांच्याकडे उपलब्ध आहेत.
       प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरुन संबंधित वसतीगृहाचे गृहपाल यांच्याकडे दि.१६ डिसेंबर २०२१ प्रर्यंत सादर करावेत, असे आवाहन, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.
                                             
 
Top