Views

 
*समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहांची
विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू*


उस्मानाबाद/प्रतिनिधी      
  
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अधिपत्याखाली मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी त्यात प्रवेश घ्यावा,असे आवाहन लातूर येथील विभागीय समाज कल्याणच्या आयुक्तांनी केले आहे.
          समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती. अनुसूचित,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जाती इतर मागसवर्गीय व विशेष मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह अनुसूचित जाती व नवबौध्द निवासी शाळा चालविल्या जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांना निवास, भोजन,निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा शासनामार्फत दिले जातात. शासकीय वसतीगृह प्रवेशा करिता अनुसूचित जाती प्रर्वगासाठी 80 टक्के व इतर प्रर्वगातील विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के जागा राखीव असतात.
          कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लातूर विभागातील वसतीगृह बहुतांशी प्रवेशित जागा रिक्त असून विद्यार्थ्यांनी या वसतीगृहात प्रवेश घ्यावा, आता कोविड-19 प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बरीच शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहेत.लातूर विभागातील शासकीय वसतीगृह ,अनुसूचित जाती व नवबौध्द निवासी शाळेत  2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्हयाच्या शासकीय वसतीगृह आणि अनुसूचित जाती व नवबौघ्द निवासी शाळा येथे प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
          लातूर विभागांतर्गत लातूर जिल्हयामध्ये 25,नांदेड जिल्हयामध्ये -16 उस्मानाबाद जिल्हयामध्ये -11,हिंगोली जिल्हयामध्ये-8,असे एकूण 60 मुला/मुलींची शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत.तसेच लातूर जिल्हयामध्ये -5,नांदेड जिल्हयामध्ये -4,उस्मानाबाद जिल्हयामध्ये-3 आणि हिंगोली जिल्हयामध्ये-1,असे एकूण लातूर विभागात 13 अनुसूचित जाती व नवबौध्द मुला/मुलींच्या शासकीय निवासी  शाळा कार्यरत आहेत. प्रवेशासाठी संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.

 
Top