Views




*ST कामगार बांधवानो भाजपा आपल्या सोबत आहे -- नितीन काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


आयुष्यभर नोकरी केली तरी शासनाच्या चतुर्थ श्रेणी (4th class) कर्मचाऱ्यांना शिपायांना मिळते तेवढीही पगार मिळत नाही, आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळणे, कुटुंबाला बऱ्यापैकी जीवनमान जगायला मिळणे, घरातील सदस्यांना आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे अशा प्राथमिक गरजा सुद्धा पुर्ण होत नाहीत....ही आहे एका एस.टी. महामंडळ कामगारांच्या जीवनाची कथा...
अशा प्रतिकुल काळात महाराष्ट्र सरकारने तुमच्या सोबत असायला पाहीजे होतं, समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी कामगारांना न्याय द्यायला हवा होता... परंतु असे नाही....असो....सरकार मायबाप असते, सगळ्या जनता जनार्धनासाठी तेच चालक मालक अन पालक सुद्धा मात्र ठाकरे सरकारला मायबाप म्हणावे अशी परिस्थिती उरलेली नाही, न्याय मागितला तर निलंबनाचा कागद हातात देणारे सरकार मायबाप कसे म्हणायचे ??? एस.टी. कामगार बांधवानो दुर्दैवाच्या या दुष्टचक्रात भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस लोकप्रिय आ.सुजितसिंह ठाकूर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.12 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद बसस्थानक येथे सुरू असलेल्या एस. टी. कामगार आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी होऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी नेताजी पाटील, ॲड.खंडेराव चौरे, ॲड.नितीन भोसले, प्रदीप शिंदे, इंद्रजित देवकते, राजसिंह राजेनिंबाळकर, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, संदीप कोकाटे, समाधान मते, प्रवीण शिरसाठे, रामदास कोळगे, संजय लोखंडे, मनोज रणखांब, नामदेव नायकल, अभय इंगळे, प्रवीण पाठक, दाजी पवार, पांडुरंग लाटे, ओम नाईकवाडी, विद्या माने, बाळासाहेब खांडेकर, युवराज ढोबळे, पांडुरंग पवार, मारुती मुंडे, लक्ष्मण माने, राहुल शिंदे, पृथ्वीराज दंडनाईक, महेश चांदणे, नाना कदम, नाना वाघ, हिम्मत भोसले, नितीन इंगळे, अमोल पेठे, प्रितम मुंडे, महेश बागल, गणेश इंगळगी, सूरज शेरकर, राज निकम, मेसा जानराव, सुजित साळुंखे, राजाभाऊ सोनटक्के, सार्थक पाटील, रोहित देशमुख, सुधिर पवार, प्रमोद बचाटे, सुनिल पंगुडवाले, बालाजी जाधव, महेश लांडगे, जगदिश जोशी, सुधीर घोलप, तेजस सुरवसे, सागर दंडनाईक यांच्या सह भाजपाचे तसेच मोर्चा व आघाड्यांचे असंख्य पदाधिकारी आंदोलन स्थळी उपस्थित होते.
 
Top