Views




*आमदार सुजितसिंहजी ठाकूर साहेब यांच्या निधीतून पाटसांगवी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन गावातील महिला
मंगल (काकू) दशरथ इंदलकर यांच्या हस्ते संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंहजी ठाकूर साहेब यांच्या निधीतून भुम तालुक्यातील पाटसांगवी येथील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरासमोरील सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन गावातील महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावचे न्यायाधीश पदावर असणारे श्री.शिवाजी इंदलकर साहेब यांच्या मातोश्री मंगल (काकू) दशरथ इंदलकर यांच्या हस्ते कुदळ टाकून सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.कविता उमेश नायकिंदे यांनी येत्या संक्रांति च्या सणापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे यावेळी सांगितले. यावेळी महिला ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामसेवक गायकवाड यांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच भगवान (दादा) नाईकनवरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
 
Top