Views


*गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ॲन्टींकरप्शच्या जाळ्यात*


हिंगोली:-

      हिंगोलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक मारोती खुशालराव नंदे (35) रा.चौंडी ता.मुखेड जि.नांदेड यांनी दिवाळी निमित्त एक महिना जुगाराचा अड्डा चालू करण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली. या लाच मागणीची पडताळणी 2 नोव्हेंबर रोजी झाली. आज दि.11 नोव्हेंबर रोजी 10 हजारापैकी 3 हजार रुपये लाच पोलीस उपनिरिक्षक मारोती नंदे यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्विकारली. या संदर्भाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार उर्वरीत लाचेची 7 हजार रुपये रक्कम स्विकारण्यास मारोती नंदे यांनी संमतीपण दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक निलेश सुरडकर, पोलीस अंमलदार विजय उपरे, रुद्रा कबाडे, ज्ञानेश्र्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, अविनाश किर्तनकार आणि हिंम्मतराव सरनाईक यांनी ही कार्यवाही केली आहे. 
 
 
Top