Views


*अत्याधुनिक ड्रोनव्दारे गावठाण भूमापन कार्यक्रमास सुरूवात*
 
              

उस्मानाबाद/प्रतिनिधी

अत्याधुनिक  ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील सर्व गांवाचे गावठाणातील सर्व मिळकत धारकांचे, मिळकतीचे मोजमाप करुन नकाशा तसेच मिळकत पत्रिका तयार करणे संबंधी महाराष्ट्र शासन- ग्राम विकास विभाग, जमावबंदी आयुक्तालय व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात अत्याधुनिक ड्रोनद्धारे गावठाण भुमापन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक ड्रोनद्धारे अचूक व जलदगतीने सर्वेक्षण भुमापन मोजणी काम होणार आहे. ड्रोन द्वारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्वाकांशी व जनता भिमुख प्रकल्प आहे या शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे सर्वेक्षण होईल, गावातील घरे, रस्ते, शासनाच्या/ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाली यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील आणि मिळकतींचा नकाशा तयार होईल. कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका (Property Card) स्वरूपात तयार होईल. ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संवर्धन होईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल.मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल.गावठाण भुमापनाची सर्व कार्यपद्धती पारदर्शकपणे राबविली जाईल व ग्रामस्थांना त्यांचे अधिकार अभिलेख सहज सुलभपणे उपलब्ध होतील.प्रशासकीय नियोजनासाठी गावठाण भूमापन नकाशे उपलब्ध होतील तसेच उत्पन्नाचे स्त्रोत निश्चित होईल.गावठाणातील जमिन विषयक मालकी हक्कांबाबत आणि हद्यीबाबत निर्माण होणारे वाद कमी करणेबाबत गावठाण भुमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.तरी गावठाण भुमापन योजनाही अत्यंत महत्त्वपुर्ण व उपयुक्त योजना आहे.योजना यशस्वी होणेसाठी सर्व ग्राम स्थांनी आपल्या मिळकतीचे सिमाकन ग्रामसेवक आणि भुकरमापकाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चुना पावडरच्या सहाय्याने वेळेवर करुन घ्यावे.सार्वजनिक मिळकती, शासन मिळकती विशेषत: रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने ग्रामविकास/भुमि अभिलेख अधिकारी/कर्मचारी यांना माहिती पुरावावी व योजनेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन परांडा तालुक्याचे उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी केले आहे.


 
Top