Views*प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना 
(PMFME ) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME ) अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनासाठी उस्मानाबाद जिल्हयाकरीता कडधान्य (हरभरा,तुर,मुग,उडीद इ.) या पिकाची निवड करण्यात आलेली आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रीया उद्योगांसाठी राबविली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती,जमाती व महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत अन्नप्रकीया उद्योगास एकुण खर्चाच्या 35 टक्के किंवा 10 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. 10 लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात येणार असुन केंन्द्राचा 60 टक्के तर राज्याचा 40 टक्के हिस्सा असणार आहे. सद्या आस्तित्वात असलेल्या छोटे प्रक्रिया उद्योगाच्या बळकटीकरणासाठी ही योजना लागु आहे. 
या योजनेअंतर्गत वैयक्तीक,शेतकरी उत्पादक संस्था,बचत गट यांना लाभ दिला जाणार आहे. तसेच तांत्रिक ज्ञान,कौशल्य आधारीत प्रशिक्षण व इतर आवश्यक सुविधा देवुन असंघटीत क्षेत्रातील सुक्ष्म उद्योजकांची क्षमता बांधणी करुन शेतकरी उत्पादक संस्था ,बचत गट,सहकारी संस्था या मार्केटींग व ब्रॅन्डींगसाठी मदत केली जाणार आहे. सदर योजनेकरीता जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. इच्छुक लाभार्थी यांनी लाभ घेणेकरीता जिल्हास्तरावर नेमण्यात आलेल्या संसाधन व्यक्ती ( DRP) (श्री.चंदन भंडगे -9422070087,श्री.निखिल शिंदे- 9421412067, सुलक्षणा सोनवणे-9579067521 , श्रीमती.पुजादेवी मस्के -9970697923,कु.आश्विनी ढेरे -9146470725,श्रीमती.आशमा सोनवेणे-9960694179 ) यांच्या मदतीने योजनेच्या http://pmfme.mofpi.gov.in या Online Portal वर अर्ज करण्याची कार्यवाही करावी.
जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात उद्योजक उभे करण्याचे उद्देशाने दिनांक 17 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.सदर कार्यशाळेस जिल्हास्तरीय अधिकारी,बॅकांचे अधिकारी,प्रस्ताव सादर केलेले लाभार्थी,इच्छुक लाभार्थी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच लाभार्थींना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. कडधान्य ही पिके उस्मानाबाद जिल्हयात मोठय 
प्रमाणात होत असल्याने कडधान्य पिकाच्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात उद्योजक उभे राहुन रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे योजनेचा लाभ मोठया प्रमाणात घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले आहे.

 
Top