Views


*राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2019-20 साठी*
*प्रस्ताव सादर करावेत जिल्हा क्रीडा अधिकारी*उस्मानाबाद/प्रतिनिधी

 केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्याकरिता नामांकनाचे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. या नामांकने केंद्र शासनाकडे नोव्हेंबरपूर्वी कालावधीत ऑनलॉईन पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहे.
तथापि केंद्र शासनाच्या पत्रात नमुद केल्यानूसार सर्व बाबींचे अवलोकन करुन ज्यांना नामांकनासाठी अर्ज/प्रस्ताव सादर करावयाचा आहे, त्यांनी प्रथम तो https://innovate.mygov.in/national-youth-award-2020/ या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावयाचा आहे. 
       तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवती व संस्थांनी सन 2019-20करिता राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.
                                                         
 
Top