Views


*नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह मंजूर*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


 केंद्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह ही सुधारीत योजना राज्यात केंद्र:राज्य:स्वयंसेवी संस्था यांच्या अनुक्रमे 60:15:25 या हिस्स्याच्या प्रमाणात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
            राज्यातील लोकसंख्या व नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहाची मागणी लक्षात घेता उस्मानाबाद जिल्हयासाठी 100 प्रवेशित क्षमतेची इमारत भाडे तत्वावर उपलब्ध करुन घेवुन नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहासाठी कार्यरत करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
           उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक स्वयंसेवी संस्था चालकानी 23 ऑगस्ट च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वे व कागदपत्राची पुर्तता करुन प्रस्तावासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,खोली क्रं.10.,उस्मानाबाद येथे संपर्क करावा असे आवाहन श्री.एस.व्ही.अंकुश,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

 
Top