Views



*एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक काम बंद आंदोलन ,महसूल,नगरपालीका कर्मचारी, पोलीस प्रशासनाची तारांबळ!*


 *कळंब आगारातील एका कर्मचाऱ्याने गळ्यात फास अडकावून झाडावर चढल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे*


 कळंब/प्रतिनिधी

     एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळत चालले आहे.  राज्यभरात ३५  एसटी  कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर आता  कळंब आगारातील एका कर्मचाऱ्याने गळ्यात फास अडकावून झाडावर चढल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्याने आपली ३६ वी आत्महत्या असेल असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.   एसटी महामंडळाचे शासनात विलगिकरण करण्यात यावे,यासह अन्य मागण्याकरिता महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले असून येथील आगाराचे कर्मचारी सच्छिदानंद पुरी हे सोमवार (दि.१) पहाटे ५  वाजलेपासून आगारा समोरील  झाडावर चढून गळ्याला फास लावून बसले आहेत.दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी शनिवारी  मध्यस्थी करत आंदोलकर्त्याची भेट घेऊन आंदोलन माघे घेण्यास करण्यात आलेली शिष्टाई फेल ठरली आहे.

गेल्या चार दिवसापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.कृती समितीच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या समवेत केलेली चर्चा फिस्कटली आहे.त्यामुळे एसटी महामंडळाची कृती समिती निर्णय घेणार कोण?कर्मचाऱ्यांना विश्वसात न घेतलेला निर्णय अमान्य असल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे.आमदार कैलास पाटील यांनी एसटीच्या कळंब आगारातील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन माहिती जाणून घेत एसटीच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली.सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होत एसटीची चाके फिरविली.मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास कर्मचारी वाहक सचितानंद पुरी यांनी  आगारा सोमोरच झाडावर चढून गळ्याला फास लावून बसल्याने एकच गोंधळ उडाला.यावेळी तातडीने घटनास्थळी आगारप्रमुख मुकेश कोमटवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश ,पोलीस निरीक्षक यशवंत जाधव,सपोनी अशोक पवार ,कुमार दराडे, अतुल पाटील, तहसीलदार श्रीमती विद्या शिंदे, विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर ,विभागीय वाहतूक अधीक्षक अश्वजीत जानराव, विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बनसोडे, नायबतहसीलदार श्री भुरके, तलाठी व्यंकटेश लोमटे भाजपचे  तालुका प्रमुख अजित पिंगळे, शहर प्रमुख संदीप बविकर,एसटीच्या कर्मचाऱ्यांनी गळ्याला फास लावून बसलेले पुरी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता,पण एसटी महामंडळाचे शासनात विलगिकरण करा,आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करू नये या मागण्यांवर ठाम असून मागण्याची पूर्तता केल्यानंतरच आपण झाडावरील खाली उतरू आत्महत्या करणार नसल्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे कर्मचारी श्री पुरी यांनी सांगितले.

-----चौकट

एसटी बंद,प्रवासाची तारांबळ;


मागच्या दोन दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने एसटी फिरू लागली होती.काही कर्मचाऱ्याच्या संघटनेत फूट पडल्याने गोंधळ उडाला आहे.येथील आगारातील बस विविध मार्गावर धावल्या होत्या,त्यामुळे एसटीची चाके सुरळीत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता.मात्र सोमवारी सुरू झालेल्या आंदोलनामुळे आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
        चौकट
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना ला पाठिंबा म्हणून सोमवारी कळंब बसस्थानकातील सर्व स्थापना धारकांनी आपली एक दिवसाकरीता दुकाने बंद ठेवून उस्फूर्तपणे या आंदोलनाला पाठिंबा दिला.


 
Top