Views


*लोकअदालतीमुळे वेळ आणि पैसा दोहोंची बचत होते  न्यायाधीश श्री. महेश ठोंबरे*


कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे भाटशिरपुरा या ठिकाणी ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व ग्रामपंचायत कार्यालय भाटशिरपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी विधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
 सदरील शिबीरामध्ये दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब श्री. महेश ठोंबरे यांनी लोकअदालतीसंदर्भात माहिती देऊन लोकअदालतीमुळे वेळ आणि पैसा दोहोंची बचत होत असल्याचे नमूद केले. तसेच विधी सेवा प्राधिकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत
 उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जागरूकता शिबिरातून विविध योजनांची तसेच कायदेशीर बाबींची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे सांगून सदरील शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. सदरील कार्यक्रमामध्ये भाटशिरपूरा येथील ग्रामसेवक श्री. एस.व्ही. पोटे यांनी पंचायत समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली.
सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन उपसरपंच सूर्यकांत खापे यांनी केले. सदरील विधी साक्षरता शिबीरासाठी विधिज्ञ मंडळ कळंबचे अध्यक्ष अॅड श्री. मंदार मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिबीरासाठी मौजे भाटशिरपुरा गावच्या सरपंच सुनिता दिलीप वाघमारे, कळंब न्यायालयातील कनिष्ठ लिपिक इरफान मुल्ला, समाधान राखुंडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाटशिरपुरा येथील ग्रामसेवक एस. व्ही. पोटे, ग्रामपंचायत ऑपरेटर रमेश उळगे यांनी परिश्रम घेतले.
 
Top