Views

      एम. रमेश उप विभागीय पोलीस अधिकारी कळंब

*नागरिकांनी नेहमी सतर्क व जागरुक राहावे - एम रमेश*

कळंब/प्रतिनिधी


दिवाळी सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी जाताना अंगावरील सोने व मौल्यवान वस्तु यांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी. सोनसाखळी चोरांपासुन सावध रहावे. ए टी एम व बँकेतुन पैसे काढल्यानंतर पैसे सुरक्षित ठेवावेत. पैसे कोणी हिसकावुन अथवा बहाना करुन नेणार नाही याची दक्षता घ्यावी.

आपले वाहन सुरक्षीत ठिकाणी पार्क करावे. ज्या ठिकाणी पार्किग सुविधा व सी.सी.टि.व्ही. कॅमेरे आहेत अशा ठिकाणी पार्क करावे. आपल्या वाहनामध्ये मौल्यवान वस्तू अगर पैसे ठेवुन बाहेर जावू नये जेणेकरुन बॅग लिफ्टींग अथवा चोरी होणार नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अथवा घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.

नागरिकांनी सणानिमित्त बाहेरगावी जाताना शेजारच्या नागरिकांना माहिती देऊन जावे व एकमेकांचे फोन नंबर्स माहिती असावे करुन घ्यावेत. घरात जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये तसेच अंगावर दागिने घालू नयेत. ते बँकेत सुरक्षीत लाॅकरमध्ये ठेवावेत. दिवसा अनोळखी व्यक्ती गावात किंवा शेत वस्तीवर संशयितरित्या फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी . कोणताही आर्थिक व्यवहार किंवा इतर खरेदी-विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करावे. महिलांनी बाजारामध्ये जाताना, गर्दीच्या ठिकाणी जाताना अथवा कार्यक्रमाला जाताना कमीत- कमी दागिने घालून जावे. कारण या ठिकाणी चोरट्यांची नजर दागिन्यावर पडल्यास ते घरापर्यन्त रेकी करीत येवू शकतात.

पुढे पोलिस आहेत तपासणी चालु आहे, पुढे खुन झाला आहे. तुमच्या अंगावरील सोने काढुन द्या, अशी बतावणी करुन फसवणुक केली जाते. अशा व्यक्तीपासुन सावध रहावे. आपल्याकडील वस्तु कोणालाही काढुन देऊ नये, सतर्क रहावे. ऑनलाइन शॉपिंग करत असताना, सुरक्षित ॲपचाच वापर करावा. आपल्या एटीएम कार्डचा पिन क्रमांक अथवा एटीएम कार्डची माहिती कोणालाही देऊ नये. बँक अशा प्रकारची माहिती विचारत नाही.
OLX वरून वाहन खरेदी करत असताना, वाहन विक्री धारकांची परिपूर्ण माहिती घेऊन, समक्ष खात्री झाल्यानंतरच वाहनांची खरेदी करावी. 
  
    अशा प्रकारच्या विविध उपयोगी आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी नेहमी सतर्क व जागरुक राहावे - 

एम. रमेश उप विभागीय पोलीस अधिकारी कळंब.
 
Top