*पक्ष्यांची काळजी घ्या;वन विभागाचा उपक्रम*
कळंब/प्रतिनिधी
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने शासनाच्या वतीने विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहे. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन व डॉ.सलीम आली पक्षीमित्र यांच्या जयंतीच्या निमित्ताने शासनाने दिनांक 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत दरवर्षी पक्षी सप्ताह साजरा करण्याचे ठरवले आहे
. त्या अनुषंगाने दिनांक 14 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम कळंब येथे पक्षांना चारा व पाणी सहजरीत्या उपलब्ध व्हावे या हेतूने परिसरातील झाडांना येळन्या बांधून त्यामध्ये चारा व पाणी बालकाश्रमचे संचालक महादेव महाराज आडसुळ यांच्या हस्ते ठेवण्यात आले .वाढते प्रदूषण,वृक्षतोड,शहरीकरण यामुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत असून पक्षी संख्या ही कमी होत आहे.यासाठी पक्ष्यांना संरक्षण मिळेल व त्यांना चारापाणी उपलब्ध होईल याची खबरदारी देण्याची गरज महादेव महाराजांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास उस्मानाबादचे विभागीय वन अधिकारी एम.आर.गायकर सहाय्यक वनसंरक्षक ली.बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी भूम प्रवन परिमंडळ अधिकारी ए.बी.मुंडे वनरक्षक कळंब,एम.ए. ढगे वन सेवक ,किल्लेदार व कालिदास जाधव आणि वन विभागातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.