Views

                                  
*पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन*

 उस्मानाबाद /प्रतिनिधी

 राज्यात विभागीय ,जिल्हा,तालुका आणि ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाद्वारे शासकीय योजना कार्यान्वित आहे.2021-22 या शैक्षणिक वर्षात मोठी शहरे,महानगरांमध्ये,विभागीय स्तर,जिल्हा स्तरावर तालुकास्तरावर दहावी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या तंत्र शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन,निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सोलापूर येथील  एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्पाच्या सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट रक्कम वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.त्यासाठी त्या त्याअभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून ऑनलाईन अर्ज करावेत.
 इतर महसूली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 28 हजार रुपये,निवास भत्ता 15हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये असे प्रती विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च 51 हजार रुपये तसेच इतर जिल्हयांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 25 हजार रुपये,निवास भत्ता 12 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 6000 रुपये असे प्रती विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च 43 हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 23 हजार रुपये,निवास भत्ता 10 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 5000 रुपये असे प्रती विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च 38 हजार रुपये देण्यात येणार आहे.या रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रती वर्ष पाच हजार रुपये आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांना प्रती वर्ष दोन हजार रुपये इतकी रक्क्म शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येते.
महानगर पालिका किंवा नगर पालिका हद्दीमध्ये आणि हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात अथवा शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. अधिक माहितीसाठी सोलापूर येथील  प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वरील मजल्यावर ,सिध्देश्वर पेठ ,जिल्हाधिकारी कार्यालय आवार, या कार्यालयात दूरध्वनी क्र.0217-2607600 आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. आंधळे यांना 8369688911 या मोबाईल क्रमांकावर  संपर्क साधावा

 
Top